Home क्राईम न्यूज रत्नापूर येथील सोलर प्लॉंट येथुन तीन लाखांची तार चोरी, गुन्हा दाखल

रत्नापूर येथील सोलर प्लॉंट येथुन तीन लाखांची तार चोरी, गुन्हा दाखल

रत्नापूर येथील सोलर प्लॉंट येथुन तीन लाखांची तार चोरी, गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील रत्नापूर रोडवर आसलेल्या एका सोलर कंपनीची ३ लाख रुपये कीमतीची १८ हजार मिटर लांबीची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश निवृत्ती साबळे (वय ५०, व्यवसाय इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर) रा. हडपसर ता. हवेली जि. पुणे, सध्या रा. म्हाडाकॉलनी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. १२ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजेपासून ते दि. १३ मे २०२६ रोजी रात्री १२ वाजेदरम्यान आयटीआय कॉलेज जामखेडकडून रत्नापूर रोडकडे जाणाऱ्या प्लांट येथे “कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादीच्या संमतीशिवाय एका कंपनीची सोलरची तार चोरून नेली आहे. अज्ञात चोरट्यांनी सोलरची ३ लाख रुपये कीमतीची तार अंदाजे १८ हजार मीटर लांबीची तार चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिस स्टेशनचे पोहेकॉ लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पो.हे.कॉ. संजय लोखंडे हे करीत आहेत.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!