
मुशाफिरी यात्रेतून भटके विमुक्त गोरगरीब वंचितांसाठी लढणारा खरा नेता ॲ.डॉ.अरुण जाधव – सुजात आंबेडकर
अहिल्यानगर प्रतिनिधी
आदिवासी भटके विमुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राची सत्ता हातात घ्यावी लागेल त्यासाठी समस्त भटक्या विमुक्त आदिवासी समाज बांधवांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात (दादा) आंबेडकर यांनी केले. भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने संत कबीर जयंती निमित्त लिंपणगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील सभागृहामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित मुशाफिरी यात्रेच्या समारोप संभारणभात ते बोलत होते.

भटके विमुक्तांचे नेते व उचल्याकार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक लक्ष्मण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास स्वागताध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ.अरुण जाधव व उमाताई जाधव, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ,भालचंद्र सावंत, आप्पा सोनवणे, अनिल सावंत, संतोष जौंजाळ, अंबरसिंग चव्हाण, गणेश पोळ, सोमनाथ भैलुमे, प्रसाद भिवसने, अजित भोसले, उत्तम सावंत, मोहन चव्हाण, नगरसेविका संगीता भालेराव, सुभाष ओहोळ
आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की भटक्या विमुक्त समाजावर गेल्या अनेक वर्षापासून खूप मोठा अन्याय झाला आहे .खरे तर याच भटके विमुक्तांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारून त्यांना इथून पळून लावले मात्र स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर ही त्यांना राहायला जागा नाही घर नाही उतारे नाहीत रेशन नाही शिक्षण नाही असे अनेक प्रश्न आहेत या सर्व प्रश्नावर मात करण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीने पुढाकार घेऊन भटके विमुकतांना सत्तेत पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे.
ॲड.डॉ.अरुण जाधव यांच्या रूपाने महाराष्ट्राला भटक्या विमुक्तांचा एक आक्रमक नेता मिळाला आहे त्यांचे नेतृत्व सर्व महाराष्ट्रासाठी व आदिवासी भटके विमुक्तांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

लेखक लक्ष्मण गायकवाड म्हणाले की स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर ही भटके विमुक्त समाज अजूनही पालामध्ये राहतो आणि या राज्यातील सत्ताधारी मंडळी मात्र महालात राहतात. भटके विमुक्तांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. मात्र आंबेडकरी विचारामुळे भटके विमुक्तांना सावली मिळाली वंचित बहुजन आघाडी या नव्या विचारपिठामुळे नव्या पिढीला राजकारण आणि समाजकारण करण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांच्या विचारांनीच आपले भले होऊ शकते त्यामुळे समस्त भटके विमुक्तांनी एकजूट होऊन लढा द्यावा अंधश्रद्धा जुन्या रुढी परंपरा सोडून द्याव्यात शिक्षणाची कास धरावी असे ते म्हणाले.
ॲड.डॉ.अरुण जाधव म्हणाले की देशात आणि राज्यात घरगणना व जनगणना सुरू झाली त्या प्रक्रियेमध्ये भटके विमुक्तांच्या झोपडी किंवा पालासाठी ऑनलाइन फॉर्ममध्ये रकानाच नसल्याने तसेच गाव गाड्यातून भटके विमुक्त कायम लांब असल्यामुळे त्यांच्या पर्यंत घरगणना व जनगणना करणारे प्रतिनिधी पोहोचणार नाहीत भटके विमुक्तांचे प्रश्न घेऊन मुशाफिरी यात्रा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातून निघाली या मुशाफिरी यात्रे दरम्यान घरगनना बाबत दिलेल्या माहितीमुळे बहुतांश भटके विमुक्तांची घरगणना झाली आहे तसेच भटके विमुक्तांच्या अनेक समस्या ऐरणीवर आल्या आहेत त्या सोडवण्यासाठी वेळोवेळी सरकारला जाब विचारला जाईल त्यासाठी धरणे आंदोलने मोर्चे अशा सनदशीर व लोकशाही मार्गाने आम्ही प्रयत्न करू असे म्हणाले.

मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेस पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला भटके विमुक्त संयोजन समितीच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले उमाताई जाधव यांनी आभार मानले.
यावेळी आप्पा सोनवणे, सोमनाथ भैलुमे, बाबुराव फुलमाळी, चंद्रकांत नेटके, रोहित गजरमल, रूपचंद सावंत, आसाराम काळे, संतोष भोसले, छाया भोसले, अशोक मोरे, राजश्री लष्करे, सुभाष कांबळे, रोहित रोडे, बाबुशा चव्हाण, गोरख शिंदे, नवनाथ शिंदे, बाबासाहेब ओहोळ, विशाल पवार, राहुल पवार,ललिता पवार, अविनाश पवार, काजूरी पवार, दिगंबर पवार, रजनी बागवान, उर्मिला कवडे, राजू शिंदे, ऋषी गायकवाड, सचिन भिंगारदिवे, तुकाराम शिंदे, सुमित भालेराव, पप्पू भालेराव उपस्थित होते.










