जामखेड प्रतिनिधी

इन्स्टीट्युट ऑफ चार्टेट अकौटंट ऑफ इंडिया या संस्थेने घेतलेल्या मे २०२२ च्या सी ए च्या परीक्षेत जामखेडचा भुमिपुत्र ओंकार देशमुख हा उत्तीर्ण झाला आहे.

ओंकार संजय देशमुख रा. सारोळा. ता. जामखेड हा सध्या पाईपलाईन रोड, अहमदनगर या ठिकाणी वास्तव्यास आहे. ओंकार याने शालेय जीवनापासून सी. ए व्हायच हे त्यान ठरवल होत. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्याने आपले शालेय शिक्षण रेणावीकर विद्यालय वैदुवाडी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण सारडा कॉलेज अहमदनगर येथे पूर्ण केले. त्याला सी ए परीक्षे दरम्यान श्री योगेश देशमुख ऑनालाईटचे संचालक श्री राजेंद्र चव्हाण सर व एस के इं डस्ट्रीजचे चेअरमन श्री संजयशेठ सुराणा यांचे सहकार्य व अमुल्य मार्गदर्शन लाभले अभ्यासातील सातत्य व आई वडिलांचे आर्शिवाद यामुळे यश मिळाल्याचे ओंकार म्हणाला.

ओंकार च्या यशाबद्दल शशीकांत कुलकर्णी, उपेंद्र कुलकर्णी, शाम भोंजाळ, चंद्रकांत भोंजाळ, उल्का कुलकर्णी अनंत कुलकर्णी, अविनाश भागवत यांनी अभिनंदन केले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत वर्गमित्र संजय पांडुरंग देशमुख याचा मुलगा चि ओंकार याने मिळविलेल्या यशाचा आम्हांस सार्थ अभिमान वाटतो असे मत लक्ष्मीकांत देशमुख व गजानन कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here