पावसामुळे भारत  ऑस्ट्रेलिया सामना थांबवला

रोखठोक ब्रिस्बेन…..

बॉर्डर-गावसकर मालिकेतील (Border Gavskar Trophy) चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथील ‘द गाबा’ या मैदानात खेळवला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. कालच्या 5 बाद 274 धावसंख्येनंतर आज सकाळच्या सत्रात ऑस्ट्रेलियाने धावफलकावर त्रिशतक लावलं आहे. काल खेळ संपला तेव्हा कॅमरॉन ग्रीन 28 तर कर्णधार टीम पेन 38 धावांवर नाबाद होते. दोघांनीही आज 98 धावांची भागिदारी करुन संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्याच्या दिशेने कूच केली आहे.

तसेच त्यामुळे आता तिसऱ्या दिवसाचा खेळ निर्धारित वेळेपेक्षा अर्धातास आधी म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५ वाजता सुरु होईल.

दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात २६ षटकात २ बाद ६२ धावा झाल्या आहेत. अद्याप भारत ३०७ धावांनी पिछाडीवर आहे.

ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारताकडून पहिल्या डावात शुभमन गिल आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीला आले. या दोघांनी सुरुवात सकारात्म केली होती. मागील सामन्याप्रमाणेच या सामन्यातही हे दोघे चांगली भागीदारी करणार असे वाटत असतानाच पॅट कमिन्सने त्याच्या पहिल्याच षटकात शुभमनला ७ धावावंर बाद केले. शुभमनचा झेल स्टीव्ह स्मिथने घेतला.

त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजाराची जोडी जमली होती. त्या दोघांची ४९ धावांची भागीदारी झाली होती. दरम्यान रोहितने काही चांगले फटके खेळले होते. त्यावरुन रोहित चांगल्या लयीमध्ये असल्याचे वाटत होते. मात्र तो १९ व्या षटकात नॅथन लायनच्या गोलंदाजीवर पुलशॉट खेळताना झेलबाद झाला. त्याचा झेल मिशेल स्टार्कने घेतला. रोहितने ७४ चेंडूत ४४ धावा केल्या. यात ६ चौकारांचा समावेश आहे.

भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्याने चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने डाव सांभाळला. त्यांनी दुसऱ्या सत्राखेर आणखी विकेटचे नुकसान होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळे दुसऱ्या सत्राखेर भारताने पहिल्या डावात २६ षटकात २ बाद ६२ धावा केल्या आहेत. पुजारा ८ धावांवर आणि रहाणे २ धावांवर नाबाद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here