रोखठोक जामखेड

पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाया चालू केल्या आहेत. अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर जामखेड पोलीसांनी धडक कारवाई करत ४५ लाख रुपयांची तीन वाहनांसह ७० लाख रुपयांची १४ ब्रास वाळू जप्त केली आहे. या तीनही वाहन चालकांविरुद्ध गौण खनिज अधिनियमन नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दि.२७ रोजी पहाटे पो. कॉ संदिप राऊत हे गुड मॉर्निंग चेकिंग करत आसताना राजेंद्र नर्सरी अरणगाव जवळ एक ट्रक
(एमएच १४ए. एच. ६७६९) जोरात जातांना संशयास्पद वाटल्याने पाठलाग केला असता ट्रकमध्ये ४ ब्रास वाळू २० हजार रुपयांची तर १० लाख रुपयांची गाडी ताब्यात घेऊन ट्रक चालक रामहारी रमेश डोके रा. भुतवडा ता. जामखेड यांच्या विरोधात गौण खनिज अधिनियमन कलम २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच दरम्यान दुसर्‍या घटनेत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार अरणगाव जामखेड रस्त्यावर पाटोदा शिवारात वाळूने भरलेला हायवा ट्रक (एमएच १६ सीसी ५७६९) विना परवाना चोरटी वाळू वाहतूक आढळली गाडी २५ लाख ३० हजार रुपयांची वाळु जप्त करत चालक परमेश्वर पांडुरंग पठाडे रा.आष्टी जि.बीड यांच्या विरोधात गौण खनिज अधिनियमन नुसार गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

तसेच अरणगाव जामखेड रस्त्यावर एस्सार पेट्रोल पंपासमोर (एमएच१६ क्यू १०११) गाडीसह विनापरवाना वाळू १० लाख २० हजार रुपयांची जप्त करत चालक अरविंद रघुनाथ पवार रा. शितपुर ता.कर्जत यांच्याविरुद्ध गौण खनिज अधिनियमन कलम २१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीनही कारवाईत ४५ लाखांची वाहने व ७० हजार रुपयांची वाळू जप्त केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पो.हे.कॉ शिवाजी भोस, संजय लाटे, पो.कॉ संग्राम जाधव, अविनाश ढेरे, आबा आवारे, दत्तु बेलेकर, विजय कोळी, संदिप राऊत, अरुण पवार, यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी भोस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here