तरुणाईने समाज उन्नतीचे काम करावे – प्रा.मधुकर राळेभात

जामखेड प्रतिनिधी

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तरुणाईने एच.आय.व्ही./एड्स यांवर पथदर्शी अधिक काम करून चर्चा घडवून आणून आरोग्य विषयी भारतीय नागरिकांच्या मनामध्ये नवा राष्ट्रनिर्माणाचा दृष्टीकोन निर्माण करण्याचे काम करावे असे प्रतिपादन प्रा.मधुकर राळेभात यांनी केले.

जागतिक एच.आय.व्ही./एड्स सप्ताहानिमित्त स्नेहालय स्नेहसक्षम प्रकल्प, दिशा एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र आणि राष्ट्रीय छात्र सेना जामखेड युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड ग्रामीण रुग्णालय येथे एच.आय.व्ही./एड्स व स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण निमित्ताने ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.वाघ, आय.सी.टी. सी.चे श्याम जाधवर, स्नेहालय समन्वयक योगेश अब्दुल, जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिल्ली तथा सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्राचार्य अविनाश फलके, प्राचार्य हरिभाऊ ढवळे, प्रा.अडसूळ, प्रा.गायकवाड स्नेहज्योतचे क्षेत्रिय अधिकारी मझहर खान, पल्लवी माने उपस्थित होते.

पुढे बोलतांना राळेभात म्हणाले की; आपले मन,मेंदू आणि मनगटाचा उपयोग तरुणाईने समाज हितासाठी करावा. एड्स बाधित रुग्णांबरोबरचा भेदभाव दूर करून सामायिक जबाबदारीने देशाच्या आरोग्यबातत सजग राहून राष्ट्र निर्माणाबरोबर समाज उन्नतीचे काम करावे.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत योगेश अब्दुले म्हणाले की; एच.आय.व्ही./एड्स बाबतचे समज-गैरसमज,एच.आय.व्ही. होण्याचे प्रमुख चार कारणे,उपचार-अँटी रेट्रोव्हायरल थेरपी व घ्यावयाची काळजी, मुलांच्या हस्तमैथुन यावर असणारे समज-गैरसमज, मुलींच्या मासिक पाळीच्या समस्या, प्रजनन व लैंगिक जंतुसंसर्ग (आर.टी. आय./एस.टी. आय), स्त्रीयांसाठी लैंगिक संसर्ग गंभीर का आहेत,त्याचे परिणाम,प्रजनन मार्ग जंतुसंसर्गाचे लक्षणे आणि एच.आय.व्ही./एड्स चे धोके याबाबत तरुणांमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्नेहालय व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग यांच्या माध्यमातून “होऊया सारे एकसंघ, करूया एच.आय.व्ही चा प्रतिबंध, एड्स मुक्त महाराष्ट्र स्वप्न नव्हे ध्येय हे ब्रीद घेऊन गेल्या तीन दशकांपासून स्नेहालय यावर जनजागृती करत आहे. महिला आणि बालकांच्या प्रश्नांवर एक पथदर्शी काम स्नेहालय’ने उभे केले आहे. एच.आय.व्ही. एड्स’चा प्रसार रोखण्यासाठी अतिजोखिम चे वर्तन असणारे भागांवर जाणीव जागृतीचे काम करते आहे. महिला, बालकांच्या आणि संसर्गित व्यक्तींच्या अधिकारांच्या प्रश्नांवर स्नेहालय नेहमीच आग्रही भूमिका घेते. एच.आय.व्ही.चा समूळ उच्चाटनासाठी तरुणांनी पुढे यायला हवे असेही आवाहनही त्यांनी केले. यावेळी एन.सी.सी. जामखेड युनिटचे विभाग प्रमुख प्रा.केळकर,प्रा.देडे, प्रा.मयुर भोसले, प्रा.सुपेकर, प्रा.नावगिरे, टी.बी विभागाचे अरुण घुंगरट, खाडे तसेच महाविद्यालयीन विध्यार्थी-विध्यार्थिनींसह एन.सी.सी.कॅडेट उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here