जामखेड प्रतिनिधी 

नगरपरिषदेस पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर आसलेल्या ११ कोटींच्या घरकुलांचे उर्वरित आसलेले प्रलंबित अनुदान जमा झाले आहे. ही बैठक राजकीय श्रेय घेण्यासाठी नाही तर लाभार्थीच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी घेण्यात आली आहे. अपुर्ण आसलेली घरे बांधा नीधी कमी पडु देणार नाही असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

नुकतेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर आसलेल्या ९३३ घरकुलांचे रखडलेले चौथ्या टप्प्यातील अनुदान आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे नगरपरिषदेस वर्ग झाला आहे. याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी नुकतीच आज २ नोव्हेंबर रोजी लाभार्थींन समवेत अडीअडचणी सोडवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस नगराध्यक्ष निखिल घायतडक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, सभापती सुर्यकांत मोरे, नगरसेवक डीगंबर चव्हाण, राजेश व्हावळ, महेश निमोणकर, गुलशन अंधारे, पवन राळेभात मोहन पवार विकास (तात्या) राळेभात, भाऊराव राळेभात, प्रधान मंत्री अवास योजनेचे इंजिनिअर अनंत शेळके, कीरण भोगे, राष्ट्रवादी काँग्रेस चे वैजिनाथ पोले सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार रोहित पवार यांनी बोलताना सांगितले की जामखेड नगर परिषद येथील ९३३ लाभार्थ्यांच्या घरकुल प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्याचे ११ कोटी १९ लक्ष ६० हजार एवढे अनुदान जामखेड नगर परिषदेच्या खात्यामध्ये नुकतेच वितरित करण्यात आले आहे. आता लाभार्थींनी तातडीने आपल्या घरांची राहीलेली कामे पुर्ण करावीत. मी स्वतः केंद्र सरकारकडे या पैशांची मागणी केली. यानंतर केंद्र सरकारने हे पैसै राज्य सरकार कडे वर्ग केले त्यामुळे त्याचाही पाठपुरावा करुन अखेर उर्वरित घरकुलाची रक्कम नगरपरिषद च्या खात्यावर वर्ग केली. तसेच लाभार्थींना घरे पुर्ण करण्यासाठी कोण कमीशन मागत आसेल तर देण्याची गरज नाही तसे कोणी पैसे मागितले तर मला कळवा त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. असे देखिल स्पष्ट आमदार रोहित पवार यांनी लाभार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले.

१०६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना देखील लवकराच सुरू होणार आसुन पुढील महिन्यात टेंडर काढुन काम सुरू करणार आहेत. तसेच घरकुलाच्या बांधकामासाठी सध्या वाळु मिळत नाही अशी तक्रार लाभार्थींनी आमदार रोहित पवार यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या शी चर्चा केली असुन लवकरच वाळुचा प्रश्न देखील सुटेल असे देखिल पवार यांनी सांगितले. शेवटी मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांनी घरकुलांची कामे व परीस्थिती या बाबत ची सविस्तर माहिती देखील या चर्चे दरम्यान दिली. तसेच घरांची कामे पुर्ण होताच चार दिवसात लाभार्थींच्या खात्यावर रक्कम जमा होईल असे देखिल मुख्याधिकारी दंडवते यांनी सांगितले.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here