खांडवी येथे मृतावस्थेत आढळला लांडगा

बिबट्याने मारला का लांडगा शोध सुरू

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यात बिबट्याची धास्ती नागरिकांनी घेतली असतानाच खांडवी येथे शाळेच्या हॉस्टेल समोर एक लांडगा मृत अवस्थेत अढळुन आला आहे. या लांडग्यावर बिबट्याने हल्ला केला का इतर कशाने त्याचा मृत्यू झाला याचा तपास वनविभाग करत आहे. या बाबत ची माहीती जामखेड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी वनविभागास दिली आहे.

जामखेड तालुक्यातील खांडवी येथील झिक्री खांडवी रोडवरील एका शाळेच्‍या होस्टेल समोरील पटांगणात एक लांडगा मृत अवस्थेत अढळुन आला. त्यामुळे खांडवी परीसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण हा लांडगा मेला की बिबट्याने मारला या बाबत शंका निर्माण झाली आहे. कारण या लांडग्यांच्या नरडीचा घोट घेतल्याने हा हल्ला बिबट्यानेच केला आहे असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याबाबत ची माहीती तातडीने खांडवी चे माजी सरपंच नरेंद्र जाधव यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना कळवली. त्या नुसार तातडीने मृत लांडग्याचे फोटो जामखेड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी वनविभागाचे अधिकारी छबीलवाड यांना पाठवले आसुन माहीती दिली. या बाबत वनविभाग त्या दृष्टीने तपास करत आहे.

दुसरीकडे तालुक्यात बिबट्या दिसल्याच्या चर्चांना उधाण आले असुन जोपर्यंत ठोस कुठला पुरवा मिळत नाही तोपर्यंत नागरिकांनी विश्वास ठेऊ नये. तसेच बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाकडुन जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील पारेवाडी व डोणगाव परीसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहेत अशी माहिती अरणगाव चे सरपंच लहु शिंदे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here