जामखेड प्रतिनिधी

मागील वर्षभरात आमदाराने शहरात एक रूपयाचे विकासकामे केली नाही. मात्र आमच्या काळात शहराच्या विकासासाठी राज्याच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर निधी आणला त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे आजही काही विकास कामे चालू आहेत. त्यामुळे माझा विश्वास आहे नगरपरिषदेवर भाजपची सत्ता येईल असे प्रतिपादन भाजप प्रदेशउपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी केले.
येथील त्रिमूर्ती मंगलकार्यालयात भाजपचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून माजी मंत्री व भाजप प्रदेशउपाध्यक्ष प्रा. राम शिंदे बोलत होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलीप भालसिंग, नितीन उदमले, ॲड अनिल लांडगे, ॲड राहुल जामदार, बाळासाहेब महाडिक, अंतु वारूळे, अमजदभाई पठाण, सुभाष गायकवाड, दादा ढवाण, दत्तात्रय जगताप यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना प्रदेशउपाध्यक्ष राम शिंदे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर चालू आहे नगर दक्षिण जिल्ह्य़ात पाच ठिकाणी ते घेण्यात आले आहे या शिबिराच्या माध्यमातून सध्याच्या प्राप्त परिस्थितीत कार्यकर्त्यांला वस्तूस्थितीची जाणीव झाली पाहिजे तो अपग्रेड झाला पाहिजे. येणाऱ्या अडचणीच्या दृष्टीने सक्षम झाला पाहिजे व त्याच्या मनात राष्ट्राच्या प्रती भक्ती निर्माण झाली पाहिजे.
भारतीय जनता पक्षाचे ब्रीद वाक्य आहे ते म्हणजे प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व सुराज्य या प्रशिक्षण कार्यक्रमात दहा वक्त्यांनी त्याबाबत मार्गदर्शन केले आहे.
या प्रशिक्षण शिबिरात जि.प.सदस्य सोमनाथ पाचरणे, भाजपा तालुकाध्यक्ष. अजय काशिद, माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य डॉ भगवान मुरूमकर, बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर, प. स. उपसभापती रवी सुरवसे, जिल्हा सरचिटणीस आजिनाथ हजारे, उदयसिंह पवार, युवा मोर्चा ताालुकाध्यक्ष पै शरद कार्ले, शहराध्यक्ष अभिजीत राळेभात, उपाध्यक्ष बापूराव ढवळे, पांडुरंग उबाळे, लहु शिंदे, मोहन गडदे, पांडुरंग माने, वैजीनाथ पाटिल, केशव वनवे, आर्चनाताई राळेभात, दिपाली गर्जे, मनिषा मोहोळकर, नगरसेवक डॉ ज्ञानेश्वर झेंडे, अमित चिंतामनी, सोमनाथ राळेभात, प्रविण चोरडीया मनोज कुलकर्णी, विठ्ठलराव राऊत, मकरंद काशिद, सुधीर राळेभात, उध्दव हुलगुंडे, ऋषिकेश मोरे आदी उपस्थित होते.
( फोटो – जामखेड येथे भाजपाने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते त्यावेळी बोलताना माजी मंत्री राम शिंदे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here