जामखेड तालुक्यात दोन ठीकाणी धाडसी चोर्‍या

पाऊने चार लाखांचा ऐवज लंपास

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील धानोरा व डीसले वाडी या दोन वेगळ्या ठिकाणी तलवारीचा धाक दाखवून अज्ञात चोरटय़ांनी चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. गेल्या एक महिन्यापासून तालुक्यातील चोरटय़ांचा धुमाकूळ थांबता थांबेना त्यामुळे नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील पहीली घटना ही धानोरा या ठिकाणी घडली आहे. फीर्यादी अविनाश बाळु तुपे, हे घरात झोपले आसता अज्ञात चोरटे यांनी पहील्या मजल्यावर जाऊन फीर्यादी झोपलेल्या आसलेल्या बेडरूमचे दरवाजाच्याची बाहेरुन कडी लावली व बेडरुम समोरील खोलीतील कपाट तोडून कपाटातील २ लाख ९० हजार ८०० रुपये रोख व सोन्याचांदीचा ऐवज चोरुन नेला.
दुसरी घटना देखील याच रात्री तालुक्यातील डीसले वाडी या ठीकाणी घडली असुन फीर्यादी बापूसाहेब दत्तात्रय कार्ले वय ३३ हे आपल्या घरात झोपले आसताना अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या बंगल्याच्या गेट चे कुलुप तोडुन फीर्यादी झोपलेल्या आसलेल्या बेडरूमचे दरवाजाच्याची आतील कडी तोडून आत प्रवेश केला व फीर्यादी यांच्या गळ्याला तलावावर लावुन आईच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व कपाटातील सोन्याचे दागिने असा एकूण ९४ हजार ४०० रुपयांचा एवज चोरुन नेला. असा दोन्ही वेगवेगळ्या घटनेत चोरटय़ांनी एकुण ३ लाख ८५ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर व पो. ना भागवत हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here