जामखेड प्रतिनिधी

जामखेड पासुन दहा बारा कीमी अंतरावर असलेल्या मात्र पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वरच्या धबधब्यावरून खाली खोल दरीत उडी मारून श्रीगोंदा येथिल ग्रामसेवकाने आत्महत्या केली आहे.

मयताच्या ओळखपत्रवरुन झुंबर मारुती गवांदे वय ५० वर्षे ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालय श्रीगोंदा असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव समजले आहे. ही घटना आज दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. ग्रामसेवक गवांदे यांनी सौताडा येथील रामेश्वरच्या धबधब्यावरून खाली खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना कळताच पाटोदा पोलीस स्टेशन चे पी.आय. पाटील साहेब व सौताडा येथील ग्रामस्थ घटनास्थळी भेट दिली या वेळी धबधब्याजवळ सदरील इसमाची बॅग सापडली यामध्ये एक ओळख पत्र सापडले या वरून हा इसमाचे नाव झुंबर मारुती गवांदे ग्रामसेवक पंचायत समिती कार्यालय श्रीगोंदा असे आहे अशी प्राथमिक माहिती आहे व या वेळी पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांनी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केली. सदर आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. उंचावरून दगडात पडलेल्या मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी अंधार पडला आसल्याने अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्या सकाळ ची वाट पाहावी लागणार असुन मृतदेह वरती आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. सौताड्यातील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वनविभागाने संरक्षणाच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. अशी मागणी गावकरी करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here