जामखेड प्रतिनिधी

स्वराज्य ध्वजाने सर्वांनाच प्रोत्साहित केलेलं असतानाच आता ध्वजाच्या सोबतीला एक अत्यंत जोषपूर्ण स्वराज्य ध्वज गीत देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व आणि कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भगव्या स्वराज्य ध्वज गीताने लहानथोरांपासून युवकांना भुरळ घातली आहे.

जोमदार अभिनिवेशाने भरलेल्या गीताची संकल्पना देखील रोहित पवार यांचीच आहे. सर्व सामाजिक प्रसारमाध्यमांवर हे गीत प्रसिद्ध करण्यात आलं असून अगदी काही तासातच या स्वराज्य ध्वज गीताने राज्यातील तमाम युवावर्गाला भुरळ घातलीय. “मातीत रूजला…गगनात सजला..नभी पसरला हा रंग..” अशा दमदार शब्दरचनेला स्वर दिला आहे
अवधूत गांधी यांनी; तर संगीत दिग्दर्शन श्रेयस नंदा देशपांडे यांनी केले आहे. पुण्याच्या पुणे स्टुडिओमध्ये चित्रित झालेल्या गाण्याची कोरिओग्राफी अभिषेक हवारगी आणि विक्की माने यांची आहे. व्हिडिओचे दिग्दर्शन आदित्य जी. राठी यांनी केले आहे तर संकलन गायत्री पाटील यांनी केले आहे.
स्वाभिमानाचं, एकतेचं आणि महाराष्ट्राच्या परंपरेचं प्रतिक असणा-या या भगव्या स्वराज्य ध्वजाच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्राची नवी निश्चयी करारी ओळख देशासमोर आणण्याचा संकल्प केला आहे. हे नवे वीररसापूर्ण स्वराज्य ध्वजगीत महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास देशापुढे नेण्यासाठी निश्चितच मोठं योगदान देईल असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी खर्ड्याच्या शिवपट्टण किल्ल्यावर या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होणार आहे त्या निमित्ताने या स्वराज्य ध्वजगीताची निर्मिती करण्यात आली आहे.

चौकट

सर्व जातीधर्मांच्या लोकांसाठीचा हा वैशिष्टयपूर्ण ७४ मीटर उंच स्वराज्य भगवा ध्वज महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे अशी माहिती स्वराज्य ध्वजाचे संकल्पनाकार आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here