जामखेड प्रतिनिधी

निर्वाण फाऊंडेशन सामाजिक संस्थेकडून दिला जाणारा २०२१ चा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जामखेड जि. अ.नगर चे कर्तव्यनिष्ठ पत्रकार धनराज भगतसिंग पवार यांना मिसेस महाराष्ट्र व मिसेस इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी, दक्षिण आफ्रिकेचे समाजसेवक बायडोम सर, आरती प्रशांत हिरे, समाज सेविका विमलताई बोधारे, निर्वाण फाउंडेशन प्रमुख निलेश आंबेडकर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

यावेळी जामखेड तालुक्यातून पुरस्कार समारोह सोहळ्यास मनसे तालुकाध्यक्ष प्रदिपजी टापरे, प्रतिष्ठित व्यापारी व समाजसेवक अमितशेठ गंभीर, भिमटोला अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, शिक्षक समिती तालुकाध्यक्ष विजयकुमार जाधव, शिवराणा फाउंडेशन संगमनेर अध्यक्ष विजय पवार, पत्रकार रोहीत राजगुरु, पत्रकार संतोष गर्जे यांच्यासह पुरस्कार्थी व त्यांच्यासह आलेले कुटुंबिय बंधू भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here