नागपूर प्रतिनिधी

जागतिक रंगभूमीवर काय सुरु आहे कसे नवे- नवे प्रयोग – नव्या विषयांसह थिएटर ला नव्याने बळकटी देतात. हे भारतीय रंगभुमी आणि रंगकर्मींनी जाणुन घेण्याची गरज आहे. परंपरेची कात टाकत नव्या बदलांसह नवी रंगभुमी निर्माण करण्याची गरज आहे. फिजीकल थिएटर अद्यापही रुजु शकले नाही पण बहुजन रंगभुमीच्या कार्यशाळेतुंन नव्याने रुजावात होणे हे अत्यंत महत्त्वाचे व आशादायी असल्याचे मत प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री , नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या स्नेहलता तागडे यांनी मांडले.

बहुजन रंगभुमी व अश्वघोष कला अकादमी नागपूर च्या संयुक्ततेत आयोजित २९ व्या नाटक- चित्रपट कार्यशाळेच्या समारोपीय समारंभात मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. आठ दिवस चाललेल्या या कार्यशाळेच्या समारोपीय समारंभाचे अध्यक्ष ललित खोब्रागडे, अनिल हिरेखन, ॲड सोनिया गजभिये, अर्चना खोब्रागडे, नाटककार वीरेंद्र गणवीर, तुषांन्त इंगळे , श्रेयश अतकर आणि शिबिर संचालक आशिष दुर्गे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अस्मिता पाटील तर आभार प्रशांत राऊत यांनी मानले. या महत्वपूर्ण शिबिरात नव्या विद्यार्थी कलावंतांना विविध तज्ज्ञांनी रंगमंचासह चित्रपटातील बेसीक थिएरी – प्रॅक्टिकल स्वरुपात मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी शिबिराथयांनी फिजिकल थिएटची प्रात्यक्षिके, एक्सपरिमेंटल थिएटर प्रस्तुती सह कलावंतांनी इमप्रुवहायझेशनस , शास्त्रीय नुत्याच्या विविधांगी छटा मुलांनी सादर केल्यात.

शिबिरासाठी सुरेंद्र वानखेडे, रिशील ढोबळे, अस्मिता पाटील, आशिष दुर्गे, डिंपल पाटील, शिवम् मस्के, रितीक भगत, अनुष्का शेंडे, ॲलेन नाखले, निखील कोसेकर, स्तवन गव्हारे, हिमांशू वाहणे, प्रियांक उके , यातीश वैद्य, समुद्र रायपूरे , निखील दांडेकर , पूनम म्हस्के, दिपक बागडे , प्रशांत राऊत, उदय बोले , वैभव रामटेके, उत्कर्ष तायडे, रोहित लोखंडे, सुरज सोनेकर , दिपांशी मुरमाडे, ईश्वरी गोडबोले, देव ननावरे , कौशिक गणेशे,जिशांत मुरमाडे, सार्थक बोरकर, गौरंग पांडे , स्वरण॔ झोडापे , ग्रीश गौरंग,वंशीका खोब्रागडे, इत्यादी विद्यार्थी कलावंतांनी या शिबिरात सहभागी होऊन सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here