जामखेड प्रतिनिधी

Aimr या ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन शी सलग्न असलेल्या जामखेड मोबाईल असोसिएशनच्या वतीने ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह येथे किराणा वाटप व वृक्षारोपण करून ७ वा वर्धापन साजरा करण्यात आला. या वेळी बालगृहतील बाल गोपाळा बरोबर, केकही कापण्यात आला.

या वेळी उपस्थित निवारा बालगृहाचे संचालक ॲड. डॉ. अरुण जाधव, संतोष केसरकर, शिंदे सर, जामखेड तालुका मोबाईल असोशिएशनचे अध्यक्ष विजय आहुजा, सुनील जगताप, देविदास गोरे, संतोष नवलाखा, सागर आष्टेकर, सुंदर परदेशी, अरूण लटके, वैभव टेकाळे, सागर शेटे, राजु माने, बशीर सय्यद, शुभम बनकर, बंडु फाळके आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी निवारा बालगृहाचे ॲड. डॉ. अरुण जाधव संतोष नवलाखा , सुनिल जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Aimra ही ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन या देशव्यापी मोबाईल क्षेत्राशी संबधित आणि मोबाईल रिटेलर साठी कार्य करणारी संघटना म्हणून aimra कडे पाहिले जाते. मोबाईल रिटेलर क्षेत्राशी संबधित समस्या सोडवत असताना, विविध समाजहिताचे कार्य करत असते. ७ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात तालुका व जिल्हा स्तरावर संघटनेच्या व्यावसायिक सदस्यांकडून जनहितार्थ विविध समाज उपयोगी कार्य केले गेले. त्या अनुषंगानेच नुकताच जामखेड शाखेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here