जामखेड प्रतिनिधी

खर्डा येथील निकिता पवार या विध्यार्थ्यांनिला सिव्हिल इंजिनिअर च्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत 90. 52 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे.

याबाबत माहिती अशी की येथील पत्रकार दत्तराज पवार यांची मुलगी निकिता पवार ही बार्शी, जिल्हा सोलापूर येथील भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती ती सिव्हिल इंजिनिअर च्या शेवटच्या वर्षात शिकत होती, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन ने घेतलेल्या परीक्षेत तिला 90. 52 टक्के गुण मिळाले आहेत तिला मिळालेल्या यशाबद्दल तिचे खर्डा व परिसरातुन अभिनंदन होत आहे, निकिता पवार हिला कॉलेजचे प्राचार्य ए.के. देशमाने सर, पाटील सर व सरवदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे तिचे संस्थेचे अध्यक्ष आमदार तानाजी सावंत व माजी मंत्री दिलीप सोपल व आमदार रोहितदादा पवार यांनी निकिता पवार हिच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here