जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील चुंबळी या ठिकाणी महापारेषणचा पोल खचल्याने त्या खाली अडकून आनंद प्रभाकर हुलगुंडे वय २५ वर्ष या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. सदरचा मृतदेह हा टॉवरच्या अॅंगल मध्ये अडकला आसल्याने गॅस वेल्डिंग च्या सहाय्याने तब्बल दहा तासांनी बाहेर काढण्यात यश आले.

खर्डा ते आष्टी अशी १३२ केव्ही च्या महापारेषण कंपनीच्या टाॅवर लाईन उभे करण्याचे काम सुरू आहे. ही लाईन जामखेड तालुक्यातील चुंबळी या ठीकाणाहु जात आहे. या ठिकाणी मयत आनंद हुलगुंडे याचे शेत आहे व या शेतात हा टॉवर उभा आहे. मात्र टॉवर उभा करण्यास आनंद चा विरोध होता अशी माहिती ग्रामस्थांन कडुन समजली. याच दरम्यान दि १० रोजी मध्यरात्री आनंद याचा या खचलेल्या टॉवरखाली अडकून मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी देखील भेट दिली होती. आनंद हा नेमका रात्री च्या वेळी त्या ठिकाणी कसा आला व तो काय करत होता या बाबत तपास सुरू आहे.

टॉवर खचला आसल्याने मृतदेह कसा काढायचा या बाबत मोठी तारेवरची कसरत होती. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना देखील होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अखेर जीव धोक्यात घालून दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महापारेषणचे अधिकारी, कामगार जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पो. ना. ज्ञानदेव भागवत, पो कॉ. सचिन सगर व चुंबळी ग्रामस्थांच्या मदतीने गॅसकटर च्या सहाय्याने मृतदेह अडकला होता तो अॅंगल कापुन दरचा मृतदेह तब्बल दहा तासांनी बाहेर काढण्यात यश आले. दुपारी हा मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. ज्ञानदेव भागवत हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here