जामखेड प्रतिनिधी

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलल्याने जामखेड तालुक्यातील भाजपच्या ४७ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे अहमदनगर चे जिल्हाध्यक्ष वसंत मुंढे यांच्याकडे सोमवारी दिले.

दोन वेळा खासदार आणि विक्रमी मतांनी विजय मिळविलेल्या डॉ. मुंडे उच्चशिक्षित असल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, अशी समर्थकांना आशा होती. मात्र, त्यांच्या ऐवजी डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी आहे. यातून जिल्ह्यातील पाथर्डी नंतर जामखेड मध्ये देखील राजीनामा सत्र सुरू झाले आहे. जामखेड मधिल जिल्हा कार्यकारणी कायम निमंत्रीत सदस्य व माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर, विधी आघाडी जिल्हा अध्यक्ष अॅड प्रविण सानप, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस काशिनाथ ओमासे, ओबीसी सेल जिल्हा कार्यकारणी सदस्य बाजीराव गोपाळघरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष वैजीनाथ पाटील, भाजपा उपाध्यक्ष संतोष पवार, तालुका कार्यकारणी कायम निमंत्रीत सदस्य नानासाहेब गोपाळघरे, भाजपा सरचिटणीस केशव वनवे, भाजपा सोशल मिडीया प्रमुख कर्जत जामखेड उद्दव हुलगुंडे, तालुका कार्यकारणी कायम निमंत्रीत सदस्य बाळासाहेब गोपाळघरे बाळु गोपाळघरे, डाॅ. सोपान गोपाळघरे, महारुद्र महारनवर, मनोज राजगुरू, मच्छिंद्र गिते, शिवाजी गिते, संदीप गिते, दिपाली गर्जे, सह एकुण ४७ जणांनी आपल्या सर्व पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांच्याकडे दिले आहेत.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here