जामखेड प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जामखेड तालुका अध्यक्षपदी सहा महिन्याच्या कालावधीसाठी हंगामी तालुकाध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार शिवाजी इकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पत्रकार संघटनेचे जिल्हा कार्यकारणी सदस्य जेष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे , जिल्हा सदस्य लियाकत शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत व मावळते तालुकाध्यक्ष , जेष्ठ पत्रकार वसंतराव सानप यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा जामखेड यांची सर्वसाधारण बैठक नुकतीच संपन्न झाली. सदर बैठकीत सर्वानुमते जुनी कार्यकारणी रद्द करुन सहा महिन्याच्या कालावधीसाठी हंगामी तालुकाध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार शिवाजी इकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ६ जानेवारी 2022 नंतर पुढील नवीन कार्यकारणीची निवड करण्यात येणार आहे. या बैठकीला पत्रकार ओंकार दळवी, संजय वारभोग, फायकअली सय्यद, दत्तात्रय राऊत, रिझवान शेख, पप्पूभाई सय्यद, गणेश जव्हेरी, अनिल धोत्रे, रामहरी रोडे, मनोज कोळपकर आदी पत्रकार उपस्थित होते.
नुतन तालुकाध्यक्ष शिवाजी इकडे यांना माजी तालुकाध्यक्ष वसंतराव सानप यांनी शुभेच्छा देऊन हंगामी तालुकाध्यक्ष शिवाजी इकडे यांना सहा महिन्याच्या कार्यकाळात सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here