जामखेड प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबदारीचा उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन करून सर्व दुकाने बंद करण्याचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जामखेड शहरातील आठ नामांकित दुकानावर जामखेड नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई करून सुमारे ऐंशी हजाराचा दंड वसूल केला असून यामध्ये जामखेड मधील नामांकित उदोगपतीच्या सुमारे तीन दुकानावरही कारवाई करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे
कोरोना सोबतच डेल्टा प्लस या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी शनिवार व रविवार या दोन दिवस कडक लॉकडाऊन करून हॉस्पिटल व मेडिकल या व्यतिरिक्त सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते मात्र जामखेड शहरात या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत होती,शनिवारी व रविवारी शहरातील मोठे व्यापाऱ्यांची दुकाने अर्ध शटर लावून चालू असून एककीकडे जामखेड शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना काही दुकानदार नियमाचा भंग करून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दुकाने सुरु ठेवत असल्याने शहरातील गर्दी कमी होत नव्हती अखेर उशिरा का होईना जामखेड नगरपरिषदेने कडक भूमिका घेत शहरातील शनिवार व रविवारी शासनाच्या नियमाचा भंग करून दुकाने उघडे केल्याप्रकरणी आठ दुकानावर दंडात्मक कारवाई केली यामध्ये एच यू गुगळे,गणेश कलेक्शन,एच यू गुगळे,विशाल एम्बोरीयम,आष्टेकर मोबाईल,महावीर स्टोअर्स एस मार्ट,ओम शांती ट्रेंडर्स याना प्रत्येकी दहा हजाराचा दंड ठोकवण्यात आला आहे नगरपरिषदेच्या या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून कारवाईत सत्यात ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे

कोरोना विषाणू बरोबरच डेल्टा प्लस आजाराने डोके वर काढले असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. याच बरोबर शहरातील दुकानदारांनीही शासनाच्या नियमचाचे पालन करणे गरजचे आहे,जर कोणी दुकानदार शनिवार व रविवार या लॉकडाऊन च्या दिवशी दुकाने चालू ठेवत असतील तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here