अहमदनगर प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश शेळके (वय ४५) यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज, मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

डॉ. गणेश शेळके हे करंजी येथील आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील रहिवासी आहेत. मंगळवारी करंजी येथील उपकेंद्रात कोविड लसीकरण सुरु होते. त्यावेळी डॉ.शेळके हे तणावाखाली असल्याचे जाणवत होते. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना एक कागद व पेन मागितला व उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा दरवाजा आतून बंद करुन घेतला.

बराचवेळ झाला तरी दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून कर्मचाऱ्यांनी शेळके यांना जेवण्यासाठी आवाज दिला. तरीही त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा सुरु केला. अखेरीस दरवाजा तोडून आत पाहिले असता डॉ. शेळके यांनी फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले. गळफास घेवून आत्महत्या करण्याच्या अगोदर डॉ. शेळके यांनी चिठ्ठी लिहुन ठेवली होती. ही चिठ्ठी त्यांच्या हातातच होती.

डॉ. गणेश शेळके यांनी लिहिलेली सुसाईड नोट मध्ये म्हंटले आहे की मी डॉ. गणेश गोवर्धन शेळके आत्महत्या करत आहे. यास कारणीभूत तालुका वैद्यकिय अधिकारी भगवान दराडे व प्रशासकीय सेवेतील तहसीलदार व कलेक्टर जबाबदार. वेळेत पेमेंट न करणे, कामाचा अतिरीक्त भार व पेमेंट कपातीची धमकी देणे, या कारणास्तव मी आत्महत्या करत आहे. अशी सुसाईट नोट सापडली असून त्यामध्ये वरीष्ठ अधिकार्‍यांची नावे असल्याने आरोग्य विभाग व प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. डॉ. गणेश शेळके यांचे पार्थिव उच्यस्तरीय तपासणीसाठी पाथर्डी येथे नेण्यात आले आहे. या प्रकारणी गुन्हा नोंदवण्यात येत असुन पो. कॉ. सतीश खोमने व अरविंद चव्हाण, भाउसाहेब तांबे व सपोनि कौशल्य निरंजन वाघ हे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here