जामखेड प्रतिनिधी

खाजगी हॉस्पिटल मध्ये मृत्यू झालेल्या मयत रुग्णांचे मुत्यू चे दाखले नातेवाईकांना लवकरात लवकर मिळावे व त्यांची पिळवणूक थांबवावी या साठी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनाच्या वतीने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना निवेदन देऊन ही अडवणूक थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडूराजे भोसले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना (कोविड) च्या लाटेत संपुर्ण लुटमार चालु होती रेमडीसिव्हर इंजेक्शन काळ्याबाजारात हजारो रूपयांना विकत घ्यावी लागत होती, काहींनी ऑक्सिजन सिलेंडर स्वतः रूग्णालयाला पुरवली परंतु काही कोरोना रूग्ण पैसे खर्च करून देखील वाचु शकले नाहीत. जर एखाद्या रूग्णाकडे बिल भरण्यास पैसे नसल्यास त्यास त्रास देऊ नये असा शासनाचा आदेश असताना देखील काही खाजगी रुग्णालयांनी सर्व नियम, आदेश न जुमानता मनमानीपणे रूग्णांना त्रास दिला व बिल वसुल केल्याच्या अनेक घटना घडल्या. अजुन देखील सर्व व्यवसाय उद्योग धंदे सुरळीत चालु झालेले नाहीत. अशी गंभीर परिस्थिती असताना ज्या रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे त्यांचे मृत्यूचे दाखले त्यांच्या नातेवाईकांना सोसायटी चे कर्ज, विमा, किंवा इतर शासकीय कामासाठी लागत आहेत व सदरील मृत्यू दाखला मिळवण्यासाठी नगरपरिषदेत रितसर अर्ज करून मागणी केल्यास नगरपरिषदेचे संबंधित अधीकारी सांगत आहेत. ‘तुमचे पेशेंट ज्या रूग्णालयात उपचार घेत होते त्यांनी त्यांचा म्रुत्युच्या नोंदीचा अहवाल ( नमुना नं. ४ ) हा पाठवलेला नसल्याने आपणास मृत्यूचा दाखला देऊ शकत नाहीत.” आधीच घरातील व्यक्ती पैसे जाऊन मृत झालेली असते व त्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर देखील त्यांच्या नातेवाईकांची पिळवणूक चालुच आहे. वास्तविक पाहता संबंधित रूग्णालयाने त्यांच्या रूग्णालयातील जन्म व मृत्यूच्या नोंदीचा अहवाल लगेच तेथील ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदला पुरवने बंधनकारक आहे परंतु हे जामखेड शहरात होताना दिसत नाही.

वास्तविक पाहता मृत्यूचा दाखला देणे हे नगरपरिषदचे काम आहे व त्यांना जर संबंधित रूग्णालय जन्म-मृत्यूच्या नोंदीचा अहवाल देत नसेल तर नगरपरिषदेने त्या रूग्णालयावर कायदेशीर कार्यवाही करणे गरजेचे आहे. परंतु जामखेडमध्ये असे होताना दिसत नाही. जनतेची ही सर्व पिळवणूक व आर्थिक लुट संगनमताने चालु आहे. या सर्वांना सदरील अधीकारी पाठीशी घालत आहेत. असा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर जामखेड मधील सर्व कोरोना कोविड सेंटर मधील मृत्यूच्या नोंदी नगरपरिषदेमध्ये करण्यास संबंधितांनवर कार्यवाही करावी म्हणजे लोकांची पिळवणूक होनार नाही. अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here