जामखेड प्रतिनिधी

दळणवळणाच्या द्रृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आसणार्‍या जामखेड – कर्जत तालुक्यातुन जाणाऱ्या व मंजुर आसुनही अद्याप काम सुरू न होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांकडे नुकतेच आ. रोहित पवार यांनी लक्ष वेधले. तसेच लवकरात लवकर ही कामे सुरू झाली पाहिजेत अशा सुचना देखील आ. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अहमदनगर येथील जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आल्या.

मतदारसंघातील अनेक प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसह, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवनसंरक्षक, सा. बां. विभागाचे अधिकारी, सहा. संचालक नगर रचना, नगररचनाकर, निवासी उपजिल्हाधिकारी,उपजिल्हाधीकारी (भूसंपादन) समन्वय अधिकारी, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग,अधीक्षक भूमी अभिलेख, कूकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी,दूरसंचार विभाग, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी आदी प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सर्वच विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आ.पवारांनी अनेक प्रश्न हाती घेतले. यामध्ये जिल्ह्यातील महत्वाचे असणारे राष्ट्रीय महामार्ग क्रं.५१६-अ अहमदनगर-करमाळा, राष्ट्रीय महामार्ग क्रं.५४८-ड श्रीगोंदा जामखेड, राष्ट्रीय महामार्ग क्रं.७५२-ई पैठण-पंढरपूर आदींचा समावेश आहे. कोणताही मार्ग केवळ मंजूर करून चालत नाही. भूसंपादनासह इतर विभागाच्या मंजुऱ्याही त्यासाठी आवश्यक असतात. शासकीय हालचाली, पाठपुरावा आदींवर वेळोवेळी लक्ष केंद्रित करावे लागते.आता या कष्टाचे फळ म्हणून लवकरच महामार्गाच्या निविदाही निघणार आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि सध्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वीही झालेल्या बैठकीत अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. राष्ट्रीय महामार्गाबाबतच्या अडचणी सोडवण्याकरिता जिल्हाधिकारी व त्यासंबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचीही आ. रोहित पवार यांनी दोन वेळा भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून यातील श्रीगोंदा-जामखेड व अहमदनगर-करमाळा या रस्त्यांना मंजूरी मिळाली असून त्याबाबत निविदाही झालेल्या आहेत.

चौकट

दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे व वाड्या-वस्त्यांना जोडणारे पाणंदरस्ते, शेतरस्ते, गावरस्ते, प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग यांच्या नव्याने मंजुर्‍या, जुन्या रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्यांना मंजुर्‍या, कर्मचारी निवासस्थाने, प्रशासकीय इमारती, पुनर्वसित गावांचे प्रश्न, वन विभागाशी संबंधित प्रकल्प यासह अनेक कामांचा आढावा या बैठकींमध्ये घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here