जामखेड प्रतिनिधी

सालाबाद प्रमाणे जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि वनविभाग जामखेड च्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण करण्यात आले.

मोहा भागातील घाटामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले मी गेल्या पंचवीस वर्षांपासून वृक्षारोपण प्रत्येक शाळेमध्ये, डोंगर दरीमध्ये करत असतो कोणत्याही कार्यक्रमात वृक्ष देऊन सन्मान करत असतो दरवर्षी १ जुलै ते ३१ जुलै पर्यंत वृक्षलागवडीचा कार्यक्रम करत असतो यावेळेस आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. चिंचोके डोंगर आम्ही डोंगरदऱ्यात टाकणार आहोत म्हणजे ते बरोबर येत असतात तसेच आंब्याच्या कोया या सुद्धा आम्ही गाडीतून जाताना टाकणार आहोत. शिवाय उन्हाळ्यामध्ये या आलेल्या वृक्षांना संगोपनाची जबाबदारी पण आम्ही घेत असतो आम्ही या वृक्षाला टँकरने पाणी टाकतो पाणी टाकण्यासाठी अनुराग आनंद गुगळे यांची मदत होत असते यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, प्रफुल्ल सोळंकी, गौरव अरोरा ,अनिल फिरोदिया, वन अधिकारी किसन पवार, शहाजी डोंगरे , भोगल जय हरी आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here