सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास ठेकेदाराची मारहाण

जामखेड प्रतिनिधी

तालुक्यातील हळगाव या ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजने येथील कामाची पाहणी करत असताना बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता रवींद्र फकीरा संसारे यांना खडी चे पैसे दिले नाहीत म्हणून शरद शिवराम पवार राहणार जामखेड याने शिवीगाळ करून मारहाण केली.

याप्रकरणी शरद पवार यांच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या बाबत घडलेली घटना अशी की रवींद्र फकीरा संसारे हे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील हाळगाव ते आगी या रस्त्याचे काम पाहण्यासाठी सरकारी वाहन क्रमांक एम एच १६ एन ०५५० याने सहकाऱ्यांसमवेत आले होते. जळगाव बस स्थानक परिसरात असताना शरद शिवराम पवार यांनी त्यांची गाडी अडवली व श्री संसार यांना शिरूर ते बसर वाडी या रस्त्याच्या कामासाठी जी खडी टाकली आहे त्याचे पैसे का दिले नाहीत असे म्हणत शिवीगाळ करून गचांडी धरून गाडीच्या खाली ओढून मारहाण केली. याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना समजताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले परंतु तोपर्यंत आरोपी पळून गेले होते. याप्रकरणी शरद शिवराम पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व याचा तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड हे स्वतः करीत आहेत.

चौकट

ठेकेदाराने शिवूर ते बसरवाडी येथील रस्त्याचे सहाशे मीटरचे खडीकरणाचे काम केले आहे त्याचे पैसेही त्याला मिळाले आहेत. पण त्याची काही खडी शिल्लक होती ती दुसर्‍या ठेकेदाराने वापरली तो ठेकेदार त्याच्या खडीचे पैसे देण्यास तयार आसतानाही पवार या ठेकेदार आमच्या कडे पैशाची मागणी करत आहे. या ठेकेदाराविरुद्ध इतरही अनेक तक्रारी आहेत. आमची काहीही चूक नसताना असे मुजोर ठेकेदार मुद्दामच आम्हाला त्रास देतात त्यामुळे त्यांचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी कनिष्ठ अभियंता रवींद्र संसारे यांनी क

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here