जामखेड प्रतिनिधी

प्रबळ ईच्छा शक्ती व एकाग्रतेने नियोजन करून अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळते. प्रामाणिकपणे कष्ट केले तर निश्चितच त्याचा आपल्या जीवनात फायदा होतो. असे प्रतिपादन कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले.

येथील नितीन डोंगरे व ज्ञानेश्वर गोरे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड तसेच डॉ. पांडुरंग सानप व भास्कर भोरे यांनी कश्मीर ते कन्याकुमारी चार हजार किलो मीटर सायकलिंग करून पर्यावरण इंधन बचत करण्याची जनजागृती करुन मोठे काम केले. यामुळे तसेच जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी विठ्ठल चव्हाण यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळाली या निमित्ताने येथिल शिवनेरी अकॅडमीच्या वतीने सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, प्रा. उगले सर, प्रा. वराट सर, काळे तलाठी भाऊसाहेब, गणेश झगडे, अजय कोठारी, जरे सर, बसवदे सर, पवार सर, विजय नागरगोजे,
पोलीस कर्मचारी, ओंकार दळवी, पप्पू सय्यद, विद्यार्थीनी व विद्यार्थी हजर होते. यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणले की, मागील सात वर्षांपासून शिवनेरी अकॅडमी जामखेडकरांसाठी एक प्रेरणास्थान बनले आहे. आतापर्यंत येथील विविध ठिकाणी १२० मुले भरती झाली आहेत. यावेळी पोलीस उपनिरीक्षक थोरात म्हणले ग्रामीण मुलेच हे करू शकतात इतर शहरी मुले इतपर्यंत पोहचत नाहीत. सूत्रसंचालन मयूर भोसले यांनी तर आभार कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here