जामखेड प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे लागू करण्यात आलेल्या नियम शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान, आमदार रोहीत पवारांनी कर्जत जामखेडमधील सलुन व्यवसायिकांना भेटी दिल्या. यावेळी सलून दुकानदारांना मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले अन अचानक आ. रोहित पवार यांनी खर्डा येथील कार्यकर्त्याच्या सलूनमध्येच दाढी करून घेतली.

सलून व्यावसायिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न जाणून घेवून त्यांना मदतीचे आणि कायम सोबत असल्याचे आश्वासन पवार यांनी दिले. दरम्यान, कार्यक्रम संपवून पवारांनी खर्डा येथील कार्यकर्त्याच्या सलूनमध्येच दाढी करून घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पवार हे अचानक सलूनमध्ये येवून दाढी करून घेण्यासाठी बसले असता दुकानदाराचीही चांगलीच धावपळ झाली. रोहित पवार हे नेहमीच नवउद्योजकांना प्रोत्साहन देत असतात. अचानक एखाद्या दुकानास भेट देवून त्यांच्याशी चर्चा करून प्रश्न जाणून घेतात व कायमसोबत असल्याचा विश्वास देत असतात.

पवार जामखेड दौऱ्यावर असताना या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. जामखेडमधील खर्डा येथे सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. राेहित पवार म्हणाले की, अनेक छोट्या व्यवसायिकांना लॉकडाउनमध्ये फटका बसला आहे. सध्या परिस्थिति पूर्ववत होत असताना प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here