जामखेड प्रतिनिधी

जय भगवान महासंघ व एसटी कामगारांच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप, जामखेड आगार व्यवस्थापक शिरसाट साहेब, सचिन मासाळ, जय भगवान महासंघाचे तालुका अध्यक्ष शिवाजी लटपटे, विशाल गर्जे, सुग्रीव जायभाय, जगन्नाथ कराड, संपत गर्जे, बाळासाहेब सारूक, रघुनाथ वारे, आनंद भणगे, तात्या जायभाय, नितीन काशीद, व देशमुख साहेब उपस्थित होते. यावेळी जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी लोकनेते गोपीनाथ राव मुंडे साहेब यांना विनम्र अभिवादन करून पुढे बोलताना सांगितले की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी सर्व समाजाच्या लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे. आज गोरगरीब जनतेचा व समाजाचा आधार हरपला असला तरी त्यांच्या प्रेरणेने जगण्याची उमेद मिळते. संघर्ष करून रास्त मार्गाने जगण्याची दिशा दाखवली आहे वंजारी समाजाचा पालक म्हणून मुंडे साहेबांचा आधार होता आज तो आधार हरवला आहे परंतु वंजारी समाजाच्या र्‍हदयात
मुंडे साहेब असल्याने क्षणोक्षणी जगण्याची प्रेरणा मिळते. आज पर्यंत राजकीय व सामाजिक क्षेत्रात फक्त आणि फक्त लोकनेते म्हणून मुंडे साहेबांचं नाव घेतलं जातं जय भगवान महासंघ व एसटी कामगारांच्या वतीने आज जामखेड आगारात पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक शिरसाट साहेब यांनी मुंडे साहेबां च्या काही आठवणी ला उजाळा दिला. देशमुख साहेब यांनी प्रमोद महाजन मुंडे साहेब यांच्या कालखंडातील माहिती सांगितली. जय भगवान महासंघाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव लटपटे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here