जामखेड प्रतिनिधी

मोबाईलवर आलेल्या मिसकॉल वर फोन केला तर शिवीगाळ झाली यानंतर पत्ता विचारून मध्यरात्री येऊन कुटुंबाला लोखंडी रॉड व दगडाने मारण्याचा प्रकार घडला यामध्ये पती, पत्नी व मुलगा जखमी झाले असून आरोपी फरार झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी जबर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जामखेड पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भाऊराव अर्जुन डाडर (वय ४६ रा. काकडे बिल्डींग तपनेश्वर गल्ली) हे रविवारी मोलमजुरी करून घरी रात्री आले असता दहाच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर फोन आले पण कामाच्या नादात घेता आले नाही म्हणून दोन अडीच तासापूर्वी आलेल्या मिसकॉलवर त्यांनी सोमवारी मध्यरात्री पावणेएक वाजता फोन केला असता समोरील व्यक्तींनी शिवीगाळ करून तुझे घर कोठे आहे असे म्हणून पत्ता विचारला असता भाऊराव डाडर यांनी त्याला घराचा पत्ता दिला.

सोमवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास भाऊ डाडर, युवराज डाडर व इतर ४ ते ५ जण तीन मोटारसायकलवरून तपनेश्वर गल्ली येथे आले. आरोपी भाऊ डाडर याने फिर्यादी भाऊराव डाडर यास फोन करून घराबाहेर बोलवले यावेळी या आरोपींनी त्यांना ओढून रस्त्यावर आणून तू लई माजला का असे म्हणून भाऊ डाडर याने फिर्यादी भाऊराव डाडर याच्या डोक्यात लोखंडी रॉडने फटका मारला तर आरोपी युवराज डाडर याने फिर्यादीच्या डोक्यात व हाताच्या कोपरावर दगड मारून जखमी केले यावेळी फिर्यादीने मोठ्याने आरडाओरड केला यामुळे घरातून फिर्यादी ची पत्नी योगीनी व मुलगा अकिलेश बाहेर आले व त्यांनी आरोपीस अडवण्याचा प्रयत्न केला असता भाऊ डाडर व युवराज डाडर याने दोघांना रॉड व दगडाने मारहाण करून जखमी केले व इतर ४ ते ५ जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच फिर्यादी भाऊराव डाडर याच्या छातीवर दगड मारून गंभीर जखमी केले व निघून गेले.

जखमी अवस्थेत रात्रीच्या सुमारास फिर्यादी त्याची पत्नी व मुलगा सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाले यानंतर जखमी भाऊराव डाडर यांच्या फिर्यादीवरून भाऊ डाडर व युवराज डाडर यांच्यासह ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल शिवीजी भोस अधिक तपास करीत आहेत.

6 COMMENTS

  1. Hello! I just wanted to ask if you ever have any
    problems with hackers? My last blog (wordpress) was hacked and I ended up losing
    many months of hard work due to no data backup. Do you have any methods to prevent hackers?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here