अहमदनगर प्रतिनिधी

महिलांचे अश्लील व्हिडीओ काढून त्यांना धमकवण्याच्या अनेक घटना आपण ऐकतो. मात्र अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका महिलेने पुरुषासोबत शरीर संबंध ठेवले. तसेच यादरम्यान तिने अश्लील व्हिडीओ चित्रीकरण केलं. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने आपल्या जाळ्यात अडकवलेला व्यक्ती हा क्लास वन अधिकारी आहे.

याच आठवड्यात अशीच एक घटना उघडकीस आली होती. यामध्ये महिलेने रचलेल्या हनीट्रॅपमध्ये नगर तालुक्यातील एक श्रीमंत व्यावसायिकाला अडकवण्यात आलं होतेे. यामध्ये महिलेच्या साथीदाराचं नाव अमोल सुरेश मोरे असल्याचं समोर आलं होतं. तसेच त्याला अटक देखील करण्यात आली होती.

या प्रकरणाची तपासणी करत असतानाच संबंधित घटना देखील समोर आली आहे. अहमदनगर येथील एका क्लास वन अधिकाऱ्याने एका महिलेसोबत शरीर संबंध ठेवले. यादरम्यान संबंधित महिलेने त्यांचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याला धमकावून त्यांच्याकडून 3 कोटी घेतले. या घटनेमध्ये एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.

दरम्यान, मागील केसमध्ये संबंधित आरोपी महिला आणि तिचा साथीदार अमोल यांनी व्यावसायिकाकडून एकूण 5 लाखांपेक्षा जास्त रुपयांचं सोनं आणि रक्कम घेतली होती. याबाबतची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी यापैकी काही दागिने आणि रक्कम जप्त केली. संबंधित महिलेने अनेक लोकांना देखील त्यांच्या हनीट्रॅपमध्ये अडकवलं असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here