रोखठोक जामखेड…. 

कोरोनाच्या काळात खरे देवदूत म्हणून ग्रामीण भागात कोविड सेंटर उभे करुन रुग्णांची सेवा सुरू केली. त्यामुळे खरे कोरोना काळातील खरे कोरोना योध्दा डॉ. भारत दारकुंडे हेच आहेत असे मत शिर्डीचे विश्वस्त सचिन तांबे यांनी व्यक्त केले.

डॉ भारत दारकुंडे यांचा नुकताच शिर्डी संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी  सचिन तांबे हे बोलत होते. सत्कार प्रसंगी अरणगाव चे सरपंच लहु शिंदे यांनी सांगितले की माझ्या मोठ्या बहिणीसाठी डॉ दारकुंडे यांनी खुप प्रयत्न केले. मात्र परंतु नशिबाच्या पुढे काही चालत नाही. बहीण धनश्री काळे हीचे र्‍हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. याप्रसंगी डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आले. १५ दिवसांनी डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलो असता सर म्हणले आपण आमच्या गावी जेऊर बायजाबाई येथे जाऊन येऊ तुमचा पण विरुनगुळा होईल. सरांच्या गावी गेल्या नंतर अत्यंत सामान्य कुटुंबातील माणूस पण कशाचाही गर्व नाही पैश्याचा हवासा नाही असा अनुभव आला. ते म्हणाले शिर्डी जवळच आहे दर्शना ला जाऊ यानंतर आमचे मित्र विश्वस्त शिर्डी संस्थांन चे सचिन तांबे यांना फोन केल्यानंतर आम्ही द्वारकामाई येथे आरती केली नंतर डॉ भारत दारकुंडे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अरणगाव चे सरपंच लहू शिंदे, किरण अंधारे, निलेश माने, उमेश ढगे उपस्थित होते.

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here